पृष्ठम्:दशरूपकम्.pdf/१७६

एतत् पृष्ठम् अपरिष्कृतम् अस्ति

ब्रह्मकर्मसमुच्चय. (विषय ३२५.) विद्वत्कंठी अर्पू गुंफुनि माला प्रयोगसुमनांची ॥ ... यद्गंधाघ्राणाने तुष्टो वृत्ती सदा बुधमनांची॥ - ब्रह्मकर्माचा समुच्चय झणजे एका ग्रंथांत ब्रह्मकर्मसंबंधी बहुतेक विष- यांचा समावेश होय. तो या ग्रंथांत असल्यावरून हा ग्रंथ ब्राह्मणमा- त्राच्या व विशेषेकरून प्रत्येक वैदिक, याज्ञिक, शास्त्री आदिकरून भि- क्षकवर्गाच्या संग्रही असणे मोठ्या अगत्याचे आहे. या ग्रंथाची प्रकरणे चार असून ज्या ठिकाणी जो विषय पाहिजे तो त्या ठिकाणी साधेल ते. वटा सप्रमाण जोडला आहे. यांत पहिल्याने बहुतेक आहिककमें, श्रा- वण्यादिप्रयोग, षोडशसंस्कार, दुष्टजननशांति, व्रतोद्यापर्ने, देवप्रतिष्ठादि नित्यनैमित्तिक, इष्टापूर्त व शांतिकपौष्टिक सर्व कर्मे, उपचान शांति, सर्व- • प्रायश्चित्तादि, साग्र अंत्येष्टीप्रयोग, संन्यास व आशौचनिर्णय इत्यादि सर्व विषय क्रमाने आले आहेत. ब्रतोद्यापनादिकांत ठिकठिकाणी लागणारी 'सर्वतोभद्रादि ५ रंगीत मंडळे व काही साधी मंडळे व यंत्रही मोठ्या प्रयत्नाने तयार करून यांत जोडली आहेत. प्रसंगी एखाद्याला विस्मरणाने मंत्राबद्दल अडचण पडल्यास ती दूर व्हावी ह्मणून यांत आ- लल्या सूक्तांचा व मंत्रांचा अकारादिवर्णक्रमाने कोश तयार करून तो विषयक्रमापुढे जोडला आहे, त्या योगाने पाहिजे ते सूक्त व पाहिजे तो मंत्र सहज सांपडून अडचण दूर होईल. या पुस्तकांत विषय आले आहेत त्यांबाहेर प्रयोगविषय मुळीच राहिला नाही असे जरी आम .. ह्मणणे नाही, तरी पण बहुतेक व्यावहारिक विषय यांत येऊन गेले आहेत असे ह्मणण्यास हरकत नाही. सर्व विषय क्रमाने जोडण्याक- 'रितां आमच्याने होईल तेवढा प्रयत्न केला आहे खरा; तरी कित्येक वि- 'यय मागाहून मिळाले त्यांची आवश्यकता वाटल्यावरून कचित् स्थली क्रम सोडूनही संग्रह करणे भाग पडले. हे पुस्तक वे. शा. सं. रा. रा. वासुदेवशास्त्री पणशीकर यांनी तयार केले आहे. ह्यांत का- गद चांगले जाड व मोहरेदार वापरले असून छपाई सुरेख केली आहे. ग्राहकांस जडजोखीम वाढू नये ह्मणून ह्याची किंमत अगदी थोडी ह्मणजे २। रु. ठेविली आहे. ट. हां. ५ आणे.