पृष्ठम्:दशरूपकम्.pdf/१७७

एतत् पृष्ठम् अपरिष्कृतम् अस्ति

(२) नामलिंगानुशासन, (अमरकोश.) हे पुस्तक आजपर्यंत बहुतेकांनी सटीक व मूळ असे छापून प्रसिद्ध केले व करीतही आहेत, त्यावरून केवळ याचे नांव ऐकून लोकाय म- हत्त्व वाटणार नाही, परंतु हे तसे नसून केवळ मूळ मात्रच आहे खरं तथापि याच्या प्रतिश्लोकांत येणारी ज्या ज्या वस्तूंची नांवे असतील ती दर पृष्ठांत त्या त्या ओळीच्या बाजूस मराठीत दिली आहेत. व कोणच्या वस्तूची किती हे समजण्याकरितां बाजूस अंकही दिले आहेत. लवकर ध्यानांत येण्याकरितां विशेषनामें तेवढी जाड ठेवून बाकी मनकर बारीक टैपांत ठेविला आहे व ठिकठिकाणी अधिक माहिती देणे ती पृष्ठाच्या शेवटी दिली आहे. ग्रंथाच्या शेवटी संस्कृत मूळपदांचा व बाहेर दाख- विलेल्या मराठी शब्दांचा अकारादिवर्णक्रमकोश जोडला आहे. त्या यो- गाने हे पुस्तक आबालवृद्धांला व विशेपतः अभ्यासी मुलांला फारच उप- युक्त होईल अशी आशा आहे. हैं . शा. सं. रा. रा. विनायक ना- रायण शास्त्री जोशी यांनी तयार केलें आहे. किं. १ । रु.८.ख. ४३ आणे. . तोषणीसार-श्रीमद्भागवत दशमस्कंध. हा अति महत्त्वाचा ग्रंथ आजपर्यंत दुर्मिळ होता. मूळ तोषणी तर अत्यंत वि. स्तृत व अवघड असल्यामुळे त्यावर प्रसिद्ध विद्वच्छिरोमणी धर्मसिंधुकार श्रीमदनंत- सुत काशीनाथोपाध्याय यांनी थोडक्यांत पण मनोहर अशी ही तोषणीसार नांवाची टीका केवळ लोकोपकारार्थ तयार केली आहे. हीत मूळ शोक न सोडता प्रत्येकाची व्याख्या केली असून स्थलविशेषीं अभिनव अर्थातरें, ध्वनितार्थ, व्यंग्य इ. त्यादि चित्तवेधक साधली असून प्रत्येक अध्यायाच्या आरंभी व मधून मधून कथास- दर्भ फिरतो त्या त्या ठिकाणी एकेक व कोठे कोठे दोन दोन पर्थे दिली आहेत ती अलंकार, प्रास व यमके यांनी ओतप्रोत भरलेली असून भक्तिरसप्रधान आहेत. या अपूर्व ग्रंथाचा सवास थोडक्यांत लाभ व्हावा ह्मणून आहीं तो महत्प्रयासाने मिळवून प्रसिद्ध विद्वानांकडून शुद्ध करवून मोहरेदार जाड कागदांवर सुंदर अक्षरांनी छापून प्रसिद्ध केला आहे. किंमत अवघी ३ रु. १. ख. 1